About us

सामाजिक बांधिलकी समस्या

व्यक्ती अथवा संस्थांनी समाजास उपयुक्त ठरतील अशा सामाजिक कर्तव्यांच निर्वहन करण्याची जबाबदारी नैतिक दृष्टीकोनातून स्विकारणे म्हणजे सामाजिक बांधिलकी होय.[ संदर्भ हवा ]

बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्यप्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. नाहीतर इतर प्राणिमात्र आणि मनुष्य यांच्यात फरकच उरणार नाही. यातून मनुष्य जर सत्प्रवृत्त असेल, निदान त्याच्यातील कृतज्ञतेची भावना मारली गेली नसेल, तर इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना वाढीस लागते. हीच सामाजिक बांधिलकी होय! या संपूर्ण विश्वात आपल्या जीवनाइतके दुसरे महत्त्वाचे काहीही नाही. हे मानवी जीवन त्रिमित आहे. जीवनाला लांबी (वय), रुंदी (प्रकृती) आणि खोली (इतरांसाठी तुम्ही काय केले) आहे. माणसाचे खरे मोठेपण या तिसऱ्या मितीवर ठरते.' प्रख्यात धन्वंतरी डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे हे विचार निश्चितच चिंतनीय, मननीय आहेत. अशा 'त्रिमित जीवनांची' आपल्या देशाला मोठीच परंपरा लाभली आहे. सामान्य माणसाला त्या थोर व्यक्तिमत्त्वांइतकं आदर्श होता येणार नाही कदाचित; पण त्यांच्या मार्गावरील गवताचं एखादं पातं व्हावं असं अनेकांना वाटतं. त्या अनेकांमधील मी एक असावं असाही विचार प्रत्येकानं करावा. कधीतरी मीही या गवताच्या मोहात पडलो होतो.

आरोग्य

शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे", अशी आरोग्याची व्याख्या आहे[ संदर्भ हवा ].

पोषणासाठी लागणार्‍या अन्नाचे पिरॅमिड

पोषण, आहार, व्यायाम, स्वच्छता, इतरांशी व्यक्तिगत संबंध या गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात.

आयुर्वेदात आरोग्याचे लक्षण असे केले आहे - समदोष; समाग्निश्च समधातुमलक्रिय; प्रसन्नात्मेन्द्रियमना; स्वस्थ इत्यभिधीयते -साचा:चरकसंहिता सूत्रस्थान अध्यात १.४१ आयुर्वेदात आरोग्याचे लक्षण असे केले आहे - समदोष; समाग्निश्च समधातुमलक्रिय; प्रसन्नात्मेन्द्रियमना; स्वस्थ इत्यभिधीयते -साचा:चरकसंहिता सूत्रस्थान अध्यात १.४१

जागतिक आरोग्य संघटनेनुसार मानसिक आरोग्य म्हणजे ,"अशी सुस्थिती ज्यात व्यक्तीला स्वतःच्या क्षमतांचे आकलन होते , तसेच ती व्यक्ती उपयोगी व लाभदायी काम करू शकते आणि तिचा समाजाच्या घडणीत मोलाचा वाट असतो." नियमित व्यायामामुळे आरोग्य उत्तम राहते.

संस्कृती संपादन करा

संस्कृती या शब्दामध्ये सम् + कृ असे दोन संस्कृत धातू आहेत. याचा अर्थ 'चांगले करणे' असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.[१]

भारतीय संस्कृती ही देशाच्या इतिहासामुळे, विलक्षण भूगोलामुळे आणि जनतेतील वैविध्यामुळे आकारास आली आहे. शेजारच्या देशांतील चालीरीती, परंपरा व कल्पना सामावून घेत, भारतीय संस्कृतीने सिंधुसंस्कृतीदरम्यान जन्माला आलेले, तसेच वैदिक काळात, दक्षिण भारतातील लोहयुगकाळात, बौद्ध धर्माच्या उद्भव आणि ऱ्हासाच्या काळात, तसेच भारताचे सुवर्णयुग, मुसलमानी आक्रमण व युरोपियन देशांच्या वसाहतींदरम्यान झालेले बदल पचवूनदेखील, स्व‌तःचे परंपरागत प्राचीनत्व टिकवून ठेवले आहे. भारतीय संस्कृतीने तिच्या इतिहासाने, अद्वितीय भौगोलिक रचनेने, वैविध्यपूर्ण लोकजीवनाने आणि शेजारील देशांच्या परंपरा व कल्पना स्वीकारून तसेच पुरातन परंपरा जपून आकार घेतला आहे.

भारतात जागोजाग वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य दिसत असूनही, आढळणारे साम्य हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोट म्हणजे भारतीय संस्कृती. ती अनेक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंचे व योगशिक्षकांचे आश्रयस्थान आहे. देशातील विविधरंगी धार्मिक उत्सव, संगीत, नृत्ये, स्थापत्यशैली यातील कलात्मक बंध, तशीच भौगोलिक रचना आणि इथला पुरातन व आधुनिक संस्कृतींचा मिलाप ह्या गोष्टी जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करत.

शिक्षण

आधुनिक पद्धती संपादन करा

पूर्व प्राथमिक शिक्षण संपादन करा

प्राथमिक शिक्षणाअगोदरच्या शिक्षणास पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतात. हे प्रामुख्याने ५ वर्षांखालील बालकांना दिले जाते. विद्यार्थी याच वयोगटात खास करून शिकत असतो

प्राथमिक संपादन करा

शाळेच्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते. हे सरकारी शाळांमध्ये मूलभूत अधिकाराअंतर्गत समाजातील सर्व विद्यार्थ्याना मोफत मिळू शकते. प्राथमिक स्तरात सर्व विद्यार्थी हे परिपूर्ण नसतात त्यांना तसे शिक्षण द्यावे लागेल

माध्यमिक संपादन करा

इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या शालेय शिक्षणास माध्यमिक शिक्षण म्हणतात. हे १२ ते १६ वयापर्यंतच्या मुलांना दिले जाते. माध्यमिक स्तरात विद्यार्थी हा सर्व विषयांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो

उच्चमाध्यमिक संपादन करा

या स्तरात विद्यार्थी एका विशिष्ट ध्येयाकडे आकृष्ट होत असतो

पदवी संपादन करा

बी.ए.बी.कॉम.बी.एस्सी.बी.ई. ई. प्रकारचे शिक्षण हे बारावी नंतर दिले जाते. हे शिक्षण महाविद्यालात दिले जाते. या स्तरात विद्यार्थी एका वेगळ्या वळणावर येऊन थांबतो

पदव्युत्तर संपादन करा

या स्तरात विद्यार्थी संशोधनाच्या मागोवा घेत असतो